श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील विद्यार्थ्यांची गेट–२०२६ परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी, ६७ विद्यार्थी पात्र; AIR-४९, AIR-५७ सह राष्ट्रीय स्तरावर संस्थेची ठळक छाप
| विद्यार्थांचे नाव | विभाग | गेट रँक | |
| आफ्शीन अल्लाबक्ष तांबोळी | टेक्स्टाईल | ४९ | ![]() |
| सिद्धेश्वर भुजंग मोरटाटे | टेक्स्टाईल | ५७ | ![]() |
| श्रद्धा गोविद वाड | इलेक्ट्रोनिक्स व टेलीकम्यूनिकेशन | ७१७ | ![]() |
| अधिराज संजीव पाटील | सिव्हिल | ८१९ | ![]() |
नांदेड : देशातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि स्पर्धात्मक समजली जाणारी GATE 2026 (Graduate Aptitude Test in Engineering) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा नोंद झाली आहे.
गेट परीक्षा ही पदव्युत्तर शिक्षण, संशोधन तसेच देशातील नामांकित आयआयटी, एनआयटी, आयआयएससी यांसारख्या अग्रगण्य संस्थांमध्ये प्रवेशासाठी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नोकरीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा स्पर्धात्मक परीक्षेत यंदा संस्थेतील एकूण ६७ विद्यार्थी पात्र ठरले असून विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
संस्थेतील विविध विभाग निहाय गेट परीक्षेत पात्र विद्यार्थी संख्या - केमिकल – २ , सिव्हिल – २ , कॉम्प्युटर – १६ , इलेक्ट्रिकल – ७ , इलेक्ट्रॉनिक्स – २४, आय.टी. – १४ , टेक्स्टाईल – २ अशी आहे.
टेक्स्टाईल विभागातील माजी विद्यार्थीनी आफ्शीन अल्लाबक्ष तांबोळी - AIR ४९, टेक्स्टाईल विभागातील सिद्धेश्वर भुजंग मोरटाटे - AIR ५७, इलेक्ट्रोनिक्स व टेलीकम्यूनिकेशन विभागीतील कंत्राटी प्राध्यापक श्रद्धा गोविद वाड - AIR ७१७, सिव्हिल विभागातील विद्यार्थी अधिराज संजीव पाटील - AIR ८१९ प्राप्त करत संस्थेच्या शैक्षणिक इतिहासात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या या यशामुळे संस्थेचे नाव राष्ट्रीय पातळीवर अभिमानाने उच्चारले जात आहे. यांनी अखिल भारतीय स्तरावर मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच चैतन्य गोविंद मोती यांनी CS & IT तसेच DS & AI या दोन स्वतंत्र विषयांमध्ये पात्रता मिळवून दुहेरी यश संपादन केले आहे. एका विद्यार्थ्याने दोन स्वतंत्र विषयांमध्ये पात्रता मिळवणे ही विशेष कौतुकास्पद बाब मानली जाते.
संस्थेतील शिस्तबद्ध व दर्जेदार शैक्षणिक वातावरण, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द आणि अभ्यासातील सातत्य यामुळे हे यश साध्य झाले आहे. अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक सक्षम झाली आहे.
संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “गेट–२०२६ परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे संस्थेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेचे आणि उत्कृष्ट अध्यापन परंपरेचे प्रतीक आहे. प्राध्यापकांचे समर्पित मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची अथक मेहनत आणि संस्थेतील सकारात्मक व स्पर्धात्मक वातावरण यांचा हा एकत्रित परिणाम आहे. AIR ४९, AIR ५७ सारखी राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी संस्थेसाठी अभिमानास्पद असून या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही उच्च ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळेल.”
या यशाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुनीलजी रायठठ्ठा सर, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई चे संचालक तथा नियामक मंडळाचे सदस्य डॉ.विनोद मोहीतकर, प्रा. डॉ विक्रम गद्रे, नियामक मंडळाचे माजी सदस्य सौ.राजश्रीताई पाटील, श्री निखिलजी मुंडले, श्री प्रशांत पौळ, श्री आशुतोष डुमरे, श्री बाबा सुखविंदर सिंघजी, डॉ. डी. डी. डोये, व डॉ. जे. व्हि. मेघा, संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे, सर्व अधिष्ठाता व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून मनःपूर्वक अभिनंदन केले.



