श्री गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगचा विद्यार्थि सुमित श्रीराम विजापुरे यांनी स्थापन केलेल्या पायडॉक बिझीनेस सोलुशन या कंपनीस उकृष्ट कार्याबद्धल सन २०१९ चा “इंडिया ५०० स्टार्टअप अवॉर्ड”
नांदेड येथील श्री गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगचा विद्यार्थि सुमित श्रीराम विजापुरे यांनी विद्यार्थि असतानाच सन २०१७ मध्ये पायडॉक बिझीनेस सोलुशन हि कंपनी सुरु केली. सदर कंपनी ने दोन वर्षाच्या काळात इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट साठी उत्तम कार्य केले. या कार्याची दखल घेत बेंचमार्क ट्रस्ट व ऑडिट पार्टनर यांनी सदर कंपनीस उकृष्ट कार्याबद्धल सन २०१९ चा “इंडिया ५०० स्टार्टअप अवॉर्ड २०१९” हा मानाचा अवॉर्ड दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात दिनांक २१.१२.२०१९ रोजी प्रदान करण्यात आला.
हे यश श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि नांदेड साठी विशेष अभिमानास्पद आहे. सुमित हा श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि नांदेड येथे अंतिम वर्षं संगणक अभीयांत्रिकी मध्ये शिक्षण घेत आहे.
एसजीजीएसचे संचालक यशवंत जोशी यांनी सुमित श्रीराम विजापुरे यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल आनंद व अभिमान व्यक्त केला. “आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी सुमित ने केली आहे” अशी प्रतिक्रिया त्यानी दिली.
या यशाचे श्रेय सुमित ने आई-वडील व अन्य कुटुंबियांना तसेच एसजीजीएस कॉलेज चे संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागाच्या सर्व प्राध्यापक व कर्मचारी आणि मित्रपरिवाराला दिले आहे. सर्वचा पाठिंबा होता म्हणूनच आपण दोन वर्षां हे काम करू शकलो, असे आवर्जून नमूद केले आहे.